परवानगी द्या अगर नका देऊ मोर्चा काढणारच : अजित पवार

परवानगी द्या अगर नका देऊ मोर्चा काढणारच : अजित पवार

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपा नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेली वक्तव्ये तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून होणारी वक्तव्ये यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे.

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपा नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेली वक्तव्ये तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून होणारी वक्तव्ये यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. यावरुन अनेक प्रतिक्रिया दिली आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतर्फे १७ डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. पण अद्याप या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.

परवानगी द्या अगर नका देऊ मोर्चा काढणारच : अजित पवार
देशात अद्याप अधिकृतपणे हुकूमशाहीची घोषणा झालेली नाही; मोर्चाला परवानगी मिळाली नसल्याने संजय राऊत संतापले

अजित पवार म्हणाले की, अशा राजकीय मोर्चाला पोलीस परवानगी देत नाहीत. सरकार कुणाचेही असले तरी असे मोर्चे येतात. त्यांना परवानगी दिलेली नाही हे माझ्या ऐकीवात नाही. लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. परवानगी मागण्याचा अधिकार आहे. तसेच, परवानगी नाकारण्याचा अधिकार त्यांचा अधिकार आहे. परंतु, आम्ही मोर्चा काढणार आहे.

आमच्या महाराष्ट्राच्या अस्मितेला घाला घालण्याचा, आमच्या दैवतावर बेताल वक्तव्य करण्याचा प्रयत्न झाला. व्यक्ती आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून मंत्र्यांकडून अपमान झाला आहे. महापुरुषांचा होणारा अपमानाशिवाय सीमा प्रश्न आहे आणि महागाई, बेरोजगारी हे प्रश्न जनतेला सतावत आहेत त्यामुळेच महाविकास आघाडीचा हा मोर्चा आहे. आम्ही मोर्चा हा काढणार आहोतच, असेही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.

परवानगी द्या अगर नका देऊ मोर्चा काढणारच : अजित पवार
उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशन गाजवणार? आक्रमक झालेले माजी मुख्यमंत्री सरकारवर आसूड ओढणार?

मी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याबाबत माहिती घेतलेली नाही. परंतु एक गोष्ट प्रकर्षाने पहायला मिळत आहे की, त्यांच्या बाजुचे जे लोक आहेत त्यांच्या ज्या चौकशा सुरू होत्या त्या सत्ताधारी लोकांना क्लीनचीट मिळायला लागल्या आहेत आणि विरोधकांच्या बाजुने असलेल्या चौकशा होत्या, त्या सी समरी दिल्या असताना रिओपन करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. चौकशी करण्याची पाऊले उचलली जातात. हे राजकीय सूडभावनेतून केले जात आहे असे म्हणायला वाव आहे, जागा आहे आणि तशी शंका सर्वसामान्य लोकांच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही, असेही अजित पवार यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com