कसब्यात धंगेकरांचा ऐतिहासिक विजय! अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, थोडी खुशी थोडा गम

कसब्यात धंगेकरांचा ऐतिहासिक विजय! अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, थोडी खुशी थोडा गम

कसब्यात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करत काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत.

पुणे : गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत असलेल्या कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल आज लागला. कसब्यात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करत काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत. तर, चिचंवडमध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप विजयाच्या वाटोवर आहेत. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. थोडी खुशी थोडा गम, असे त्यांनी म्हंटले आहे.

कसब्यात धंगेकरांचा ऐतिहासिक विजय! अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, थोडी खुशी थोडा गम
कसब्यात रवींद्र धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय; हेमंत रासनेंनी पराभव केला मान्य

रवींद्र धांगेकर यांना उमेदवारी देऊन आम्ही अर्धी लढाई जिंकलो होतो. तळागाळात काम करणारा कार्यकर्ता. ते दौंड तालुक्यातील पण मागील २० वर्ष पुण्यात रहात आहेत. आम्ही सर्व मित्र पक्षांची एकजूट बांधण्यात यशस्वी ठरलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री तिथे होते. सर्व गोष्टींचा वापर सत्ताधाऱ्यांनी तिथे केला. तेथील मतदाराने सुद्धा सांगितले की तिथे काय परिस्थिती होती. पण जनतेला आम्हाला कौल दिला.

पिंपरी-चिंचवडमध्ये सुद्धा आमचा विजय झाला असता. राहुल कलाटे यांना मी सतत सांगितले पण त्यांनी ते ऐकले नाही. कारण तेथून ते उभा रहावे म्हणून काही जण सतत प्रयत्नात होते. नाहीतर दोन्ही जागी आमचा विजय झाला असता. पण, सत्ताधारी पक्षाने सर्व यंत्रणांचा वापर केला, असा आरोप त्यांनी केला आहे.

राहुल व नाना काटे या दोघांची मते बघितली तर ती भाजप उमेदवारांपेक्षा जास्त आहेत. यातून एक सिद्ध होते जर महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र येऊन व्यवस्थित रणनीती आखली विशेष करून कोण उमेदवार जनतेच्या पसंतीचा आहे. यावर लक्ष दिले तर आम्ही जनतेच्या मनात पोहचू. ज्या प्रकारे हे शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले आहे ते जनतेच्या पसंतीचे नाही हे सिद्ध होते, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

मुख्यमंत्री कुठे रोड शो करतात का? पण, मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे, अस ते म्हणाले. पण, सर्वसामान्यांनी जे करायचं ते केले, असा जोरदार टोला अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे.

दरम्यान, पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच रविंद्र धंगेकर आघाडीवर होते. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा 73 हजार 194 मतांनी विजय झाला. तर, हेमंत रासने यांना 62 हजार 244 मते मिळाली आहेत. तर, चिंचवडमध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप 71 हजार 799 हजार मते मिळवत आघाडीवर आहेत. तर, राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना 61 हजार 540 मते व राहुल कलाटे यांना 23 हाजार 255 मते मिळाली आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com