Ajit Pawar |NCP | Cabinet Expansion
Ajit Pawar |NCP | Cabinet ExpansionTeam Lokshahi

खातं वजनदार किंवा हलकं नसतं, अजितदादांचा मंत्र्यांना टोला

हे वजनदार खातं, हे थोडसं हलकं फुलकं खातं असं नसतं; अजित पवार
Published by :
Shubham Tate

ajit pawar : राज्य मंत्रिमंडळाचं अखेर खातेवाटप जाहीर झालं. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून 40 दिवस उलटल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यानंतर आठवडा उलटल्यानंतर खातेवाटप जाहीर करण्यात आलं. खातेवाटपाच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून सरकारवर वारंवार ताशेरे ओढले जात होते. (ajit pawar targets ministerial post in eknath shinde government)

अखेर मंत्रिमंडळासाठी खातेवाटप जाहीर झालं. खातेवाटपावरून सरकार मधील काही नेते नाराज असल्याची चर्चा जोर धरत आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराज मंत्र्यांना टोला लगावला आहे. आपण जे म्हणतो की हे वजनदार खातं, हे थोडसं हलकं फुलकं खातं असं नसतं. तुम्हाला काम करायचं म्हटलं तर कुठल्याही खात्यामध्ये तुम्ही काम करु शकता, असं अजित पवार यांनी म्हणत मंत्र्यांना टोला लगावला आहे.

Ajit Pawar |NCP | Cabinet Expansion
सौदी अरेबियाच्या या निर्णयामुळे जगभरातील मुस्लिम खूश

दरम्यान, विशेष म्हणजे या मंत्रिमंडळात भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर मोठी जबाबादारी सोपवण्यात आली आहे. त्यांना महसूल विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. जेव्हा कारभारापेक्षा सरकारवरच लक्ष्य केंद्रित केलं जातं तेव्हा मंत्रिमंडळाच्या विस्ताराला 41 दिवस लागतात. त्यातही अजून एका विस्ताराचं आश्वासन दिलं जातं. त्यानंतर खातेवाटपाला 5 दिवस लागतात. त्यामध्येही सत्तासंतुलनाचा असमतोल दिसून येतो. तसेच यामध्ये महिलांना आणि राज्याची राजधानी असलेल्या मुंबईला प्रतिनिधित्व न मिळणे हे निराशाजनक असल्याची बोचरी टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Ajit Pawar |NCP | Cabinet Expansion
Video : भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी 6 खंड, तीन महासागरांसह जगभरात फडकवला तिरंगा

दरम्यान पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, 75 वर्षात खूप काही साध्य केलं. अजूनही खूप आव्हानांना तोंड द्यायचं आहे. खूप काही साध्य करण्याचा प्रयत्न झाला आहे. लोकांनी निवडून दिलं असेल तर घराणेशाही कशी म्हणता, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पलटवार केला.

भ्रष्टाचार आणि घराणेशाही हे देशाला लागलेली कीड आहे, असे मोदींनी आज आपल्या भाषणात म्हटले होते. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, जनता उमेदवारांना निवडून आणते. पिढी कर्तृत्वान असल्यास घराणेशाही म्हणणं चुकीचं आहे. नेहरु, इंदिरा गांधींची कारकीर्द आपण बघितली, अशा शब्दांत त्यांनी मोदींच्या घराणेशाहीवरील टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

खातेवाटपावरुन अजित पवार म्हणाले की, कोणाला कोणतं खातं द्यायचं हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. लोकांनी आपल्या परीने खात्यांचं महत्व ठरवलं. कुणी गद्दारी केली, नाही केली, जनतेला माहिती आहे. काम करायचं असेल तर कुठल्याही खात्यात करु शकतो, असेही त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com