राष्ट्रवादीतील नाराजी उघड; अजित पवार व्यासपीठावरुन निघून गेले

राष्ट्रवादीतील नाराजी उघड; अजित पवार व्यासपीठावरुन निघून गेले

राष्ट्रीय कार्यकरणीच्या बैठकीदरम्यान अजित पवार नाराज असल्याचे पाहायला मिळाले

नवी दिल्ली : राष्ट्रवादीतील नाराजीनाट्य पुन्हा एकदा उघड झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रसचे राष्ट्रीय कार्यकरणीच्या बैठकीदरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अजित पवार हे थेट व्यासपीठावरुन निघून गेले. यामुळे आता राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहेत.

काय झाले नेमके?

शरद पवार बोलण्याला उभे राहण्यापुर्वी अमोल कोल्हे भाषण करतील, अशी घोषणा करण्यात आली. अमोल कोल्हेंनंतर जयंत पाटील भाषण यांच्या नावाची घो।णा करण्यात आली. याचवेळी कार्यकर्ते अजित दादांनी भाषण करावे, अशी घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यानंतर अजित पवारांचे भाषण होणार असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. मात्र, अजित पवार यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर ते स्वतः उठून पाठीमागे गेले. आणि त्यानंतर शरद पवार बोलतील, असे त्यांना वाटले होते. परंतु, पुन्हा एकदा अजित पवार यांच्या भाषणाची घोषणा करण्यात आली. सुप्रिया सुळे स्वताः गेटच्या पाठिमागे गेल्या आणि अजित पवार यांना भाषणास येण्याची विनंती केली. त्यांना बोलविण्याचे प्रयत्न केले. याचदरम्यान, राष्ट्रवादीचे हिंदीमधून गाणे लॉन्च करण्यात आले. युथ कॉंग्रेसचा झेंडा लॉन्च करण्यात आला. तरीही ते बोलले माही,

काय म्हणाले अजित पवार?

यावेळी बरीच भाषणे झाली. शेवटी राष्ट्रीय अधिवेशन असताना वेगवेगळ्या राज्यातील मान्यवर यांनीही आपले विचार मांडण्याचे होते. महाराष्ट्रातून छगन भुजबळ, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, फुल्ल पटेल अनेक दिग्गजांनी भाषणे केली. मी नाराज नाही. राज्याचं नाही तर राष्ट्रीय अधिवेशन असल्यामुळे भाषण केलं नाही, असे अजित पवार म्हणाले.

Lokshahi
www.lokshahi.com