पुण्यात अजित पवारांचाच आव्वाज...! तब्बल 'इतक्या' जागांवर विजयी

पुण्यात अजित पवारांचाच आव्वाज...! तब्बल 'इतक्या' जागांवर विजयी

राज्यात ग्रामपंचायतींच्या निकालात महायुतीची सरशी दिसून येत आहे. यातही ग्रामपंचायतींच्या निकालात अजित पवार गटाचे मोठ्या प्रमाणात वर्चस्व दिसून येत आहे.

पुणे : राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. ग्रामपंचायतींच्या निकालात महायुतीची सरशी दिसून येत आहे. यातही ग्रामपंचायतींच्या निकालात अजित पवार गटाचे मोठ्या प्रमाणात वर्चस्व दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यातही अजित पवार गटाने निर्विवाद यश मिळवले आहे. तब्बल 109 जागांवर अजित पवार गटाने झेंडा फडकविला आहे.

पुण्यात अजित पवारांचाच आव्वाज...! तब्बल 'इतक्या' जागांवर विजयी
सकाळच्या बोलक्या पोपटाने निकाल सुट्टीवर गेलेल्या पक्षप्रमुखांना कळवावे; कुणी केली टीका?

पुणे जिल्ह्यात 231 जागांसाठी ग्रामपंचायत निवडणूक झाली. यातील 109 जागांवर अजित पवार गटाने विजय मिळवला आहे. तर, शरद पवार गटाला 27 जागांवर समाधान मानावे लागले आहे. याशिवाय भाजपला 34 जागा मिळाल्या आहेत. शिंदे गटाने 10 जागांवर यश मिळवले. तर, ठाकरे गटाला 13 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला 25 आणि 11 जागांवर इतर पक्षांना विजय मिळाला आहे.

बारामती तालुक्यातील एकूण 26 ग्रामपंचायतींपैकी 24 ग्रामपंचायतींवर अजित पवार गटाने विजयी झेंडा फडकवला आहे. तर दोन ग्रामपंचायतीत भाजपचा सरपंच निवडून आला आहे. पारवडी गावात भाजपने 9 आणि राष्ट्रवादीने 4 जागा जिंकल्या आहेत. काटेवाडी ग्रामपंचायत पुन्हा अजित पवारांच्या ताब्यात गेली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com