Ajit Pawar: भावी मुख्यमंत्री पदावरून टोचले कार्यकर्त्यांचे कान; म्हणाले …

Ajit Pawar: भावी मुख्यमंत्री पदावरून टोचले कार्यकर्त्यांचे कान; म्हणाले …

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा युवा मिशन कार्यक्रम दरम्यान अजित पवार यांना वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले.
Published by :
Dhanshree Shintre

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा युवा मिशन कार्यक्रम दरम्यान अजित पवार यांना वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले. हे वय तसं बघितलं तर युवकांचं फार महत्त्वाच वय असतं. या वयात आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही स्वप्न असतात. अंगात एक उम्मीद असते. आपल्या भविष्याकडे आपली नजर असते. लाथ मारेल तिथे पाणी काढायची धमक ज्यांच्या अंगी असते तोच खरा युवक असतो. युवक हे कुठल्याही देशातल्या सामाजिक व राजकीय बदलांचा आधार असतात. आज जग बदलतंय, या बदलत्या जगासोबत आपल्याला देखील पुढे जायचं आहे आणि जायचं असेल तर तुम्हा सर्वांना देखील नव्या जगाच्या नव्या युगाचा बदलांचा स्वीकार करावा लागेल. आज जग बदलत आहे, आपल्याला हा आमूलाग्र बदल स्वीकारायला लागणार आहे, असा सल्ला अजित पवार यांनी यावेळी तरुणांना दिलां.

मात्र आता अजित पवार यांनी या मुद्द्यावरून आपल्या कार्यकर्त्यांचे कान टोचले आहेत. “जरा कळ सोसा, सारखं मुख्यमंत्री मुख्यमंत्री करू नका. आधी संघटन बांधू, ते मजबूत करू” असं अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. हल्ली सोशल मीडियाला अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळं आपल्याला खूप जागरूक राहावं लागणार आहे. विनाकारण आपल्याला कोणी टार्गेट करत असेल तर त्यांना उत्तरं द्या. वरिष्ठांच्या निरोपाची वाट पाहू नका. फक्त उत्तर देताना कोणाच्या भावना दुखावू नका, नवीन वाद निर्माण करू नका. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा युवा मिशन कार्यक्रमा दरम्यान अजित पवार म्हणाले.

गटागटाचे राजकारण करू नका. प्रत्येकाला आपले विचार पटतीलच असं नाही. मात्र बहुमत जाणून घ्या, सर्वांच्या मतांचा विचार करूनच पुढं जायचं असतं. यालाच लोकशाही म्हणतात. महायुती सरकार नवं युवा धोरण आणणार आहे. या धोरणात नेमकं काय असावं याबाबत तुम्ही काही बाबी सुचवा. तुमच्या ही मतांचा आदर केला जाईल. आपली बदनामी होता कामा नये, याची काळजी घ्या असे अजित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com