'बारामतीमधील लोकांना कोणते बटन दाबायचे माहितीये'

'बारामतीमधील लोकांना कोणते बटन दाबायचे माहितीये'

भाजपच्या मिशन बारामतीवर अजित पवार यांचा टोला

पुणे : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणशिंग फुंकले आहे. यावेळी भाजपने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामतीकडे विशेष लक्ष दिले आहे. यासाठी भाजपचे विविध नेते बारामतीचा दौरा करत आहेत. यावरुन आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपला टोलेबाजी केली आहे. बारामती मधील लोकांना माहिती आहे की कुठले बटन दाबायचे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

अजित पवार यांनी आज पुण्यातील गणपतींचे दर्शन घेतले असून विसर्जन मिरवणुकीला हजेरी लावणार आहेत. यावेळी त्यांना भाजपच्या मिशन बारामतीबद्दल विचारले असता अजित पवार यांनी बारामतीत किती जण आले किती जण गेले. खूप लाटा मी बारामतीत पाहिल्या आहेत. बारामती मधील लोकांना माहिती आहे की कुठले बटन दाबायचे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात आले तेव्हा उशिरा आले. तुम्ही लवकर आलात असा प्रश्न विचारला. यावर अजित पवार म्हणाले, आमचा वेळ महत्त्वाचा असतो तसा बाकीच्यांना पण वेळ महत्त्वाचा असतो, असाही निशाणा त्यांनी साधला आहे.

दरम्यान, राज्यात एकीकडे राजकीय खळबळ माजलेली असताना नुकताच राज्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा पार पडला. अशातच भाजपने स्वबळावर आगामी निवडणूक लढण्यासाठी तयारी सुरु केली आहे. भाजपने बारामती व मुंबईकडे विशेष लक्ष ठेवले आहे. यासाठी लवकरच अर्थमंत्री निर्मला सीतारमण बारामतीचा दौरा करणार आहेत. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही बारमतीकडे आपले लक्ष वळविले आहे. बारामतीची जबाबदारी वसंत मोरे यांच्या खांद्यावर दिली आहे.

Lokshahi
www.lokshahi.com