Ajit Pawar: अजित पवार यांचं बारामतीकरांना भावनिक साद

Ajit Pawar: अजित पवार यांचं बारामतीकरांना भावनिक साद

मीच उमेदवार आहे असे समजून बारामतीकरांनी मतदान करण्याचे थेट आवाहन अजित पवारांनी आज (रविवारी) बारामतीत केले.
Published by :
Dhanshree Shintre

गेली अनेक वर्षे आपण वरिष्ठांच्या विचारांना मान देत त्यांच्या विचारांच्या उमेदवारांना विजयी केले, शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आता अजित पवार यांनीच थेट आपल्या विचाराचा उमेदवार देण्याचे जाहिर केले आहे. मीच उमेदवार आहे असे समजून बारामतीकरांनी मतदान करण्याचे थेट आवाहन अजित पवारांनी आज (रविवारी) बारामतीत केले.

बारामतीकर एका गंभीर समस्येतून आगामी काळात जाणार आहात, असा उल्लेख करत एकीकडे अजित पवार सांगतात अस करा, आणि एकीकडे वरिष्ठ सांगतात अस करा, बारामतीकरांनी कुणाच ऐकायच. माझी एवढीच विनंती आहे, इतक्या दिवस वरिष्ठांच ऐकलं आता माझ ऐका इथून पुढं माझ्या विचाराचा खासदार झाला, तर नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याकडे विकासकामे घेऊन जाऊ, त्यांच्याकडून केंद्रातील कामे करुन घेऊ. यातूनच सुधारणा होतात. नुसते लोकप्रतिनिधी निवडून देऊन चालत नाही, असे कितीतरी आमदार खासदार होतात, अडचणी सोडविणारा खासदार हवा. तुम्हाला भावनिक होऊन चालणार नाही, विकासाचा विचार करा असा सल्लाच अजित पवारांनी दिला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याशी माझे अतिशय चांगले संबंध आहेत. तुमच्या लोकप्रतिनिधीला थेट देशाचे पंतप्रधान चांगले ओळखतात. त्यामुळे आपल्या विचाराचा खासदार निवडून आला तर विकासाची कामे अधिक वेगाने मार्गी लावण्यासाठी मी पंतप्रधानांकडे आग्रह धरू शकेल. त्यामुळे अजित पवार हेच निवडणुकीला उभे आहेत असे समजून बारामतीकरांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. नुसते इकडे तिकडे फिरणारे खासदार नकोत, विकास कामे करणारे खासदार आपल्याला हवेत, असे म्हणत पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर देखील निशाणा साधला.

आता तुम्ही विचार करायचा आहे की विकास आणि सुधारणा तुम्हाला अशाच वेगाने करायच्या आहेत की नाही? बारामतीत आर्थिक सुबत्ता कशी नांदेल यावर आम्ही लक्ष केंद्रीत केलं आहे. बारामतीसाठी आम्ही सगळेचजण जिवाचं रान करुन काम करता आहेत असंही अजित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com