Mla Ganpat Gaikwad Firing: उल्हासनगर गोळीबार प्रकरणावर अजित पवार यांची प्रतिक्रिया

Mla Ganpat Gaikwad Firing: उल्हासनगर गोळीबार प्रकरणावर अजित पवार यांची प्रतिक्रिया

उल्हासनगरमध्ये पोलिस निरीक्षकांच्या केबिनमध्ये गोळीबाराची घटना घडली. हिल लाईन पोलिस ठाण्यामध्ये गोळीबाराची ही घटना घडली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

उल्हासनगरमध्ये पोलिस निरीक्षकांच्या केबिनमध्ये गोळीबाराची घटना घडली. हिल लाईन पोलिस ठाण्यामध्ये गोळीबाराची ही घटना घडली आहे. गणपत गायकवाडांनी ही गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी भाजप आमदारासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच उल्हासनगर गोळीबार प्रकरणावर अजित पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.

उल्हासनगर गोळीबार प्रकरणासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून, अजित पवार यांनी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याविषयी बोलणार असल्याचे मत व्यक्त केल आहे. त्याचबरोबर एवढ मोठ टोकाचे पाऊल त्यांनी का उचललं व त्याबाबत रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु मुख्यमंत्र्यांच छोट ऑपरेशन झाल असल्यामुळे त्यांचा संपर्क होऊ शकला नसल्याचे मत देखील यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केल आहे.

Mla Ganpat Gaikwad Firing: उल्हासनगर गोळीबार प्रकरणावर अजित पवार यांची प्रतिक्रिया
उल्हासनगर गोळीबारांवरून नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

कल्याण पूर्वेत शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यात नेहमीच वादावादी तसेच आरोप प्रत्यारोप होत होते. हिललाईन पोलीस ठाण्यात दोन्ही नेते आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन जमले. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. आमदार गायकवाड यांनी पोलीस निरीक्षणकांसमोरच महेश गायकवाड यांच्यावर 5 गोळ्या झाडल्या. यामध्ये महेश गायकवाड यांच्यासह त्यांचा एक सहकारी गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com