अजित पवारांनी घेतली अमित शहांची भेट? स्वतः केला खुलासा, म्हणाले...

अजित पवारांनी घेतली अमित शहांची भेट? स्वतः केला खुलासा, म्हणाले...

नाराजीच्या चर्चांवर अजित पवारांची प्रतिक्रिया

नागपूर : विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून रंगल्या आहेत. यातच, गृहमंत्री अमित शहा यांची अजित पवारांनी भेट घेतल्याचेही बोलले जात आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. यावर अखेर अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. माझ्यावर एवढं प्रेम उतू का चाललंय, असा खोचक सवाल त्यांनी विचारला आहे.

अजित पवारांनी घेतली अमित शहांची भेट? स्वतः केला खुलासा, म्हणाले...
त्याग आणि समर्पणामुळेच आप्पासाहेबांचा सन्मान : अमित शाह

नागपूरच्या सभेत भाषण करणार नसल्याची माहिती स्वतः अजित पवारांनी दिली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात मविआच्या अनेक सभा होणार आहेत. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि अनिल देशमुखच आज भाषण करणार आहेत. तर, काँग्रेसकडून नाना पटोले, सुनील केदार भाषण करण्याची शक्यता आहे. स्थानिक नेत्यांचा समन्वय वाटला पाहिजे त्यासाठी सभेत प्रत्येक पक्षाचे 2 नेते भाषण करणार आहेत, असे अजित पवारांनी सांगितले आहे.

तर, माझी आणि अमित शाहांची भेट झाली नाही. अशा भेटी लपून राहत नसतात, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. तसेच, माझ्यावर एवढं प्रेम उतू का चाललंय, असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.

दरम्यान, नागपुरात आज मविआची दुसरी वज्रमूठ सभा होणार आहे. अनेक अडथळे पार करून उद्या होत असलेली ही सभा ऐतिहासिक होईल असं मविआच्या नेत्यांचं म्हणणं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर होते, मात्र ते नागपुरातील सभेला हजर राहणार आहे. तर, अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून जोर धरत आहेत. यामुळे मविआच्या या सभेला अजित पवारांच्या उपस्थितीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com