'संजय शिरसाटांनी केलेलं ट्विट रात्रीच अन् आज ते नाही, यातला अर्थ समजून घ्या'

'संजय शिरसाटांनी केलेलं ट्विट रात्रीच अन् आज ते नाही, यातला अर्थ समजून घ्या'

संजय शिरसाट यांना अंबादास दानवेंचा मिश्कील टोला

मुंबई : शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी ट्विटवर उध्दव ठाकरेंचा व्हिडीओ शेअर केल्याने राजकारणात एकच वादळ निर्माण झाले आहे. यावर शिरसाट यांनी स्पष्टीकरणही दिले आहे. परंतु, विरोधकांनी संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधत आहे. संजय शिरसाट यांनी केलेलं ट्विट रात्रीच आहे. आणि आज ते नाही यातला अर्थ समजून घ्या, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.

विरोधी पक्षनेते पद मिळाल्यानंतर अंबादास दानवे हे सर्व वाद विसरून शिवसेना जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्या भेटीला गेले आहेत. यावेळी आम्ही दोघे मिळून 50 जणांना पुरून उरू, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिली असून मंत्रिपदासाठी संजय शिरसाठ यांनी हे ट्विट केले होते आणि दबाव आल्यामुळे त्यांनी ट्विट डिलीट केल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे. संजय शिरसाट यांनी केलेलं ट्विट रात्रीच आहे. आणि आज ते नाही यातला अर्थ समजून घ्या. शिवसेना आता धर्मशाळा नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, संजय शिरसाट यांनी शुक्रवारी रात्री उध्दव ठाकरे यांचा कुटुंबप्रमुख म्हणत एक जुना व्हिडीओ ट्विट केला. परंतु, हा ट्विट केलेला व्हिडीओ काही क्षणातच शिरसाट यांनी डिलीट केला. यानंतर आज संजय शिरसाट यांनी कालचं ट्विट हे तांत्रिक अडचणींमुळे केलेलं होते, अशी सारवासारव केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com