राजकारण
Ambadas Danve : सरकार जर गुन्हेगाराला सोडून गुन्हा उघड करणाऱ्यांसोबत जर अशा पद्धतीने वागत असेल तर...
किरीट सोमैया व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे.
किरीट सोमैया व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे. किरीट यांच्या तक्रारीनंतर संपादक कमलेश सुतार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळतेय. यावर सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर अंबादास दानवे म्हणाले की, मीडिया लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. मी सुद्धा त्याविषयी पेन ड्राईव्ह सभागृहामध्ये दिला. सरकारने त्यावर अजून काहीच केलं नाही. तपास करायचा नाही आणि गुन्हा दाखल करायचा. अधिवेशन होऊन आता बरेच दिवस झाले. मात्र अजूनही या गोष्टीचा कोणताही तपास झालेला नाही.
सरकार जर गुन्हेगाराला सोडून गुन्हा उघड करणाऱ्यांसोबत जर अशा पद्धतीने वागत असेल तर या सरकारचे पापाचे घडे आता भरलेले आहेत. लोकशाहीवर हा मोठा आघात आहे. असे मला वाटते. असे अंबादास दानवे म्हणाले.