सोमय्यांचा तुमच्याकडे एक तर माझ्याकडे अनेक व्हिडीओ; दानवेंचा गंभीर दावा

भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यावरुन ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही घणाघात केला आहे.

मुंबई : भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. यावरुन ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही घणाघात केला आहे. अनेक महिलांनी तक्रारी केल्या आहेत. त्या योग्य व्यासपीठावर मांडू, असेही त्यांनी सांगितले आहे.

भाजप नेते किरीट सोमय्यांनी अनेक प्रकरणात ईडीकडे वेगवेगळ्या तक्रारी केल्या आहेत. ईडी यांच्या तालावर नाचते असेही ऐकले आहे. आणि अशा साधनसूचतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपच्या नेत्याचा हा व्हिडीओ आता समोर येतोय. परंतु, नैतिकता, परंपरा या सगळा विषय आहे की नाही, असे विषय असताना भाजप देशाची संस्कृती, हिंदुत्वाताची संस्कृती, अध्यात्माची संस्कृतीवर भाषण करतात आणि त्याच पक्षाचा नेता अशाप्रकरे समोर येतोयं हे दुर्दैवी आहे. या घटना कुठं झाल्या, कशा झाल्या, कोणकोण आहे, याची चौकशी गृहमंत्रालयाने करावी. तसेच, भाजपने भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असे अंबादास दानवे यांनी म्हंटले आहे.

अनेक महिलांनी तक्रारी केल्या आहेत. माझे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान यांच्याशी जवळचे संबंध आहेत. ते माझ्या तालावर नाचतात असे म्हणून काही लोकांना ब्लॅकमेल केले असल्याच्या तक्रारी माझ्या कानावर आल्या आहेक. त्या योग्य व्यासपीठावर मांडू, असेही त्यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com