Ambadas Danve
Ambadas DanveTeam Lokshahi

बेगडी मिंधे गॅंगची हीच किंमत का? अंबादास दानवेंची शिंदे गटावर विखारी टीका

बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर अंबादास दानवेंची शिंदे गटावर टीका.

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेच्या जागांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. येत्या निवडणुकीत भाजप 288 पैकी 240 जागा लढवणार असल्याचं ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आले आहे. विरोधकांकडून आता शिवसेनेवर टीका होत असताना आता राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर विखारी टीका केली आहे.

Ambadas Danve
बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर जयंत पाटलांचे मोठे विधान; म्हणाले, शिंदे गट टिकेल असे...

काय म्हणाले अंबादास दानवे?

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावरून शिंदे गटावर दानवे यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. त्यांनी बावनकुळे यांच्या विधानाचा दाखला देत ट्विट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, मिंधे गटाची हिच का किमंत? असा प्रश्न उपस्थितीत केला आहे.

पुढे ते म्हणाले की, २०२४ विधानसभेत मिंधे गटाला ४८ जागा देण्याचे सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचा प्लॅन जाहीर करून टाकला. 'बाळासाहेबांचा विचार' पुढे नेणाऱ्या बेगडी मिंधे गॅंगची हीच किंमत का मग? उचला अजून 'महाशक्ती'च्या पालख्या! आता कळलं असेल उद्धव साहेबांनी का लाथ मारली भाजप सोबतच्या युतीला, असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com