Abdul Sattar
Abdul SattarTeam Lokshahi

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व कधीच सोडले म्हणून कम्युनिस्ट, वंचित जवळ आले, सत्तारांची विखारी टीका

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने कधीच सोडले आहे. येत्या काळात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच खरे हिंदुत्ववादी असतील.
Published by :
Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. अशातच अंधेरी पूर्व निवडणुकीवरून ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर कृषीमंत्री अब्दुल सत्तर यांनी उद्धव ठाकरे आणि कम्युनिस्ट पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची भेटीवर जोरदार टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने कधीच सोडले आहे. म्हणूनच कम्युनिस्ट आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी जवळ आली आहे, असा टोला सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांना लगवाला आहे. औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलतांना सत्तार यांनी हे विधान केले आहे.

Abdul Sattar
आजपासून टी20 वर्ल्ड कपला सुरुवात; असे होणार सामने

काय म्हणाले सत्तार?

शिवसेनेशी कम्युनिस्ट पक्ष आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीशी वाढती जवळीक यावर बोलताना सत्तार म्हणाले की, प्रकाश आंबेडकर कायम शिवसेनेवर टीका करत होते, मग आता त्यांना उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व मान्य आहे, असे का म्हणावे वाटले? हा खरा प्रश्न आहे. असा सूचक प्रश्न त्यांनी ठाकरेंना केला आहे.

एमआयएम आणि वंचित यांची आघाडी होती, ती तुटल्यामुळे आता आंबेडकर साहेब उद्धव ठाकरे यांच्याशी हातमिळवणी करण्यास तयार झाले असावेत. त्यांच्या स्वतंत्र पक्ष आहे, ते त्याचे मालक आहे, त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे, त्यावर आम्ही भाष्य करणे योग्य नाही. असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले आहे.

Abdul Sattar
राज ठाकरेंचा पाठोपाठ शरद पवारांची अंधेरी पूर्व पोटनिवडणुक बिनविरोध करण्याची मागणी

येत्या काळात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच खरे हिंदुत्ववादी

पुढे बोलताना सत्तार म्हणाले की, आता पुर्वीची शिवसेना राहिलेली नाही. बाळासाहेबांचे हिंदुत्व त्या पक्षाने सोडले आहे, त्यामुळे कम्युनिस्ट पक्षाला ठाकरेंची शिवसेना आपली वाटत असावी. बाळासाहेबांची खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच आहे आणि तेच बाळासाहेबांचा वारसा पुढे चालवतील, येत्या काळात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच खरे हिंदुत्ववादी असतील.असा विश्वास यावेळी बोलताना सत्त्तार यांनी बोलताना व्यक्त केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com