राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या दिल्लीत झालेल्या भेटीवर अमित ठाकरे यांची पोस्ट म्हणाले...

राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या दिल्लीत झालेल्या भेटीवर अमित ठाकरे यांची पोस्ट म्हणाले...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित शाह यांची आज दिल्लीत बैठक झाली.
Published by :
Dhanshree Shintre

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित शाह यांची आज दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत काय चर्चा झाली याबाबत अजूनही काही तपशील समोर आलेला नाहीये. तसेच राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरेसुद्धा दिल्लीला गेले होते. याच पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह साहेब यांची भेट घेतली. मलाही या ग्रेट-भेटीचा साक्षीदार होता आलं!

तसेच राज ठाकरे यांनीदेखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीबाबत अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीचे ट्विटर अकांऊटवर पोस्ट केली आहे. पोस्ट शेअर करत राज ठाकरे म्हणाले की, आज केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह ह्यांच्याशी दिल्लीत भेट झाली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com