अजित पवार गटाच्या उत्तर सभेवर Amol Kolhe म्हणाले, कितीही उत्तर सभा झाल्या तरी...
पुण्यातील आळेफाटा इथं आज शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन करत आहेत. कांदा निर्यातीवर 40 टकके शुल्क लागू केल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शेतकरी रास्ता रोको आंदोलन करत आहेत. शरद पवार यांची 17 ऑगस्टला बीडमध्ये जाहीर सभा झाली. या सभेनंतर आता आता लवकरच अजित पवार गट उत्तर सभा घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमोल कोल्हे म्हणाले की, राजकारणात अडकण्यापेक्षा महाराष्ट्राचा बळीराजा संकटात आहे. त्यासाठी उपाययोजना करणं जास्त महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळी राजकारण न करता बळीराजाला दिलासा द्यावा. कितीही उत्तर सभा झाल्या तरी बळीराजाच्या प्रश्नांना उत्तर देणं जास्त महत्त्वाचं आहे. असे अमोल कोल्हे म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकार कधीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उभ राहिलं नाही. 40 टक्के कर वाढवण्याचा निर्णय अत्यंत तुघलकी आणि दुर्दैवी आहे. ही तर अघोषित निर्यात बंदी आहे.केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आज रास्ता रोको करणार दोन महामार्ग रोखून धरणार आहोत. असे अमोल कोल्हे म्हणाले.