...तेव्हा अजित पवारांना नक्कीच कान धरण्याचा अधिकार होता; असं का म्हणाले अमोल कोल्हे?

...तेव्हा अजित पवारांना नक्कीच कान धरण्याचा अधिकार होता; असं का म्हणाले अमोल कोल्हे?

अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघातील कारभारावरून भाष्य केलं होतं. अजित पवारांच्या या टीकेला अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिले.

शिरूर : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघातील कारभारावरून भाष्य केलं होतं. अमोल कोल्हेंच्या विरोधात उमेदवार देणार असून शिरूर लोकसभेची जागा जिंकणारच, असा विश्वासही अजित पवारांनी व्यक्त केला होता. अजित पवारांच्या या टीकेला अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिले.

...तेव्हा अजित पवारांना नक्कीच कान धरण्याचा अधिकार होता; असं का म्हणाले अमोल कोल्हे?
Devendra Fadnavis On Corona : कोरोना वाढतोय, फडणवीसांनी नागरिकांना केली 'ही' विनंती!

अमोल कोल्हे म्हणाले की, अजित दादा हे फार मोठे नेते असून त्यांच्यावरती माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी बोलने उचित ठरणार नाही. दादा आमचे नेते होते. मात्र, त्यांनी मधल्या काळात भूमिका बदलली. मात्र, आम्ही अजूनही त्याच भूमिकेवर ठाम आहोत. मात्र जेव्हा त्यांनी भूमिका बदलली नव्हती. तेव्हा त्यांना नक्कीच कान धरण्याचा अधिकार होता, असा निशाणा त्यांनी अजित पवारांवर साधला आहे.

तसेच, जेव्हा शिवस्वराज्य यात्रा केली, तेव्हा दादाच सोबत होते. विधानसभा प्रचार केला, तेव्हाही दादा सोबत होते. मग तेव्हा दादांनी पाठराखण केली पाठीवरती शाबासकीची थाप दिलं. पण मात्र त्यांनी आज एखाद्या विरोधात स्टेटमेंट केलं तर त्यावर मी लगेच बोलणं उचित ठरणार नाही, अशा शब्दात अजित पवारांवर अमोल कोल्हे यांनी भाष्य केलं आहे.

दरम्यान, अमोल कोल्हे यांनी चॅलेंज स्वीकारले असेल तर असू द्या पण अजित पवार यांनी चॅलेंज दिले तर जिंकून दाखवतो, हे लक्षात ठेवा निकाल लागल्यावर कळेल, अशा शब्दात अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर पुन्हा एकदा तोफ डागली. त्यांना पक्षात कोणी घेतले, तिकीट कुणी दिले हे विचारा, निवडून आल्यानंतर कितीदा राजीनामा देण्याचा विचार असल्याचे सांगितले तेव्हा कोणी अडवले हे विचारा, असा हल्लाही त्यांनी चढवला. त्यांचा मतदार संघात संपर्क नाही, असेही त्यांनी म्हंटले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com