amol kolhe sharad pawar
amol kolhe sharad pawarTeam Lokshahi

शरद पवारांना जाणता राजा मानता का? अमोल कोल्हे म्हणाले...

जाणता राजावरून राजकीय वर्तुळात नवा वाद; अमोल कोल्हे यांनी दिली प्रतिक्रिया

नाशिक : स्वराज्यरक्षक, धर्मवीरनंतर आता जाणता राजावरून राजकीय वर्तुळात वाद सुरू झाला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना जाणता राजा म्हणायला काय अडचण आहे? असा सवाल छगन भुजबळांनी उपस्थित केला होता. यावरुन नव्या वादाला तोंड फुटले असून सत्ताधाऱ्यांनी छगन भुजबळांवर तोफ डागली आहे. अशातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

amol kolhe sharad pawar
अयोध्येतील राम मंदिर कधी होणार तयार? अमित शहांनी तारीखच सांगितली

अमोल कोल्हे म्हणाले की, हे प्रत्येकाचे मत आहे. दुर्दैवाने आम्ही फक्त प्रतिक्रिया देतो. प्रतिक्रिया देण्यापेक्षा इतिहास पोहचवण्याची कृती करायला हवी. मी एक गोष्ट मानतो की, छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेवाद्वितीय आहे. माणसाच्या जन्मात येऊन कर्तृत्वाच्या जोरावर देवाच्या रुपात पोहचता येतं, याचे उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज. जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा अशी जर कुणी इतरांची तुलना करत असेल, तर स्वतः पवार साहेब सुद्धा ही गोष्ट अमान्य करतील. पण, सगळ्या परिस्थितीची माहिती असलेला, जाण असलेले नेतृत्व या भावनेतून म्हटलं असेल तर ती जाण असणं, ही गोष्ट वाईट नाही, असे म्हणत त्यांनी भुजबळांचे समर्थन केले आहे.

amol kolhe sharad pawar
....तर इतिहास माफ करणार नाही; मुनगंटीवारांची अजित पवारांवर टीका

छत्रपती शिवाजी महाराज यांची कुणाशीही तुलना होत नाही आणि होऊ शकतही नाही आणि कुणी करण्याचा प्रयत्न देखील करू नये, इतकं स्पष्ट सगळ्या शिवभक्तांचे म्हणणं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना अकारण रोजच्या राजकारणात ओढू नका. हे मी स्वतः सहित सगळ्यांना सांगतोय. कोणताही पक्ष, कोणतेही पद, कोणतीही खुर्ची शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यासमोर शून्य आहे. अकारण हवा दिल्याने महत्त्वाचे प्रश्न बाजूला राहत आहे. या तरुणाईला आम्ही मूलभूत प्रश्नापासून जर बाजूला नेले, तर मेंढ्यांचा कळप आपल्याला तयार करायचा आहे का? की बलशाही राष्ट्राच्या दृष्टीने तरुणांना घडवायचे आहे, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

amol kolhe sharad pawar
सहामाही परीक्षेत आम्ही पास झालो, आता वार्षिक परीक्षेत...: एकनाथ शिंदे

ते पुढे म्हणाले, मी कधीच कुणाच्या शिवभक्तीवर शंका घेत नाही. आपल्या राजांचे आभाळभर कर्तृत्व आहे. आपण जर एकमेकांमध्ये वाद घालत बसलो, तर आपण कपाळ करंटे म्हटलो पाहिजे. हे चरित्र जाज्वल्य पद्धतीने सांगायला हवं. इतिहासाचे दगड भिरकवण्यापेक्षा, ते दगड रचले पाहिजे. एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा खांद्याला खांदा लावून इतिहास पोहचविण्यासाठी उभे राहायला पाहिजे. या मोठ्या कार्यकर्तृत्वाला एकमेकांच्या मतभेदात, वादात अडकवू नये, असेही अमोल कोल्हे यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com