Bageshwar Baba
Bageshwar BabaTeam Lokshahi

जिथे दिसेल तिथे ठोका; बागेश्वर बाबांच्या 'त्या' वादग्रस्त विधानावर मिटकरी आक्रमक

बागेश्वर बाबांनी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने वादात

मुंबई : चमत्काराच्या दाव्यामुळे बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आले आहे. बागेश्वर बाबांनी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने ते वादात सापडले आहे. त्यांच्या विधानावरुन महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तर, राजकीय वर्तुळातूनही मोठ्या प्रमाणात टीका केली केली जात आहे. अशातच, राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी तर बागेश्वर बाबांना दिसेल तिथे ठोका, असे म्हंटले आहे.

Bageshwar Baba
शिवरायांच्या अपमानावेळी मोर्चेकरांच्या तोंडात बूच होते का? राऊतांचा सवाल

तुझ्या सारख्यांची कोल्हे कुई सुरू असते. तेव्हा अशांच्या नाजूक भागांवर फटके दिल्यावरच यांचे तोंड बंद होतं. तुकारामांच्या भाषेत सांगायचं म्हणजे तुका म्हणे गाढव लेका, जिथे दिसेल तिथे ठोका. म्हणून त्यांना दिसेल तिथे ठोकलं पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे.

तसेच, उभ्या बाजारात कथा, हेतो नावडे पंढरीनाथा, अवघे पोटासाठी सोंग, तेथे कैंचा पांडुरंग? लावी अनुसंधान, काही देईल म्हणवून, काय केले रांडलेंका, तुला राजी नाही "तुका", अशा तुकाराम महाराज अभंग गाथामधील ओळी मिटकींनी ट्विट करत भामटासाधू असा हॅशटॅग दिला आहे.

काय म्हणाले होते बागेश्वर बाबा?

संत तुकाराम महाराष्ट्रातील एक महात्मा होते. त्यांची पत्नी त्यांना रोज काठीने मारायची. कुणी तरी त्यांना विचारलं, तुम्ही रोज बायकोचा मार खाता. तुम्हाला लाज नाही वाटत का? त्यावर तुकाराम म्हणाले, मला मारहाण करणारी बायको मिळाली ही देवाचीच कृपा आहे. ती व्यक्ती म्हणाली, यात देवाची कृपा काय? तेव्हा तुकाराम म्हणाले, प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर मी देवाच्या प्रेमात पडलो नसतो. भक्तीत लीन झालो नसतो. मारहाण करणारी पत्नी मिळाल्याने देव मला त्याची सेवा करण्याची संधी तर देतो, असे विधान त्यांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com