लोकशाही मराठी चॅनलविरुद्ध केलेली कारवाई सूड भावनेतून; अमोल मिटकरींनी केला निषेध

लोकशाही मराठी चॅनलविरुद्ध केलेली कारवाई सूड भावनेतून; अमोल मिटकरींनी केला निषेध

किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओप्रकरणी तपास सुरु असतानाच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने लोकशाही मराठी न्यूज चॅनलला नोटीस बजावत 72 तासांसाठी लोकशाही मराठी न्यूज चॅनेल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओप्रकरणी तपास सुरु असतानाच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने लोकशाही मराठी न्यूज चॅनलला नोटीस बजावत 72 तासांसाठी लोकशाही मराठी न्यूज चॅनेल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. अशातच, अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत या कृतीचा निषेध व्यक्त केला आहे.

लोकशाही मराठी चॅनलविरुद्ध केलेली कारवाई सूड भावनेतून; अमोल मिटकरींनी केला निषेध
मोठी बातमी! पुढील 72 तास लोकशाही वृत्तवाहिनी राहणार बंद, कारण...

अमोल मिटकरी म्हणाले की, लोकशाही मराठी चॅनल 72 तासांकरीता अचानक बंद केले जाणे ही लोकशाहीची पायमल्ली आहे. लोकशाही मराठी चॅनलने आतापर्यंत नेहमी सामान्य जनतेचा विषय मांडला आहे. लोकशाही मराठी चॅनलविरुद्ध सूड भावनेतून केलेल्या कारवाईचा मी निषेध व्यक्त करतो, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, या कारवाईसंदर्भात मुख्य संपादक कमलेश सुतार यांनी माहिती दिली आहे. किरीट सोमय्यासंदर्भात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून नोटीस आली होती. या नोटीसीला उत्तरही देण्यात आलेले होते. आम्हाला पुढील 72 तास चॅनेल बंद करण्याच्या सूचना आलेल्या आहेत. आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून 72 तासांसाठी लोकशाही चॅनेल बंद करण्यात आलेलं आहे. सूचनांचे आम्ही पालन करुच, पण, आमची बाजू ऐकून घेण्याची अपेक्षा होती. अद्यापही या प्रकरणाचा तपास सुरु होता. परंतु, आम्हाला थेट शिक्षा सुनावल्याचा एक प्रकार आहे. याविरोधात कायदेशीर लढाई लढणार आहोत, अशी माहिती कमलेश सुतार यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com