दादा आपण लहान आणि नवखे आहोत अजुन राजकारणात; अमोल मिटकरी असं कुणाला म्हणाले?

दादा आपण लहान आणि नवखे आहोत अजुन राजकारणात; अमोल मिटकरी असं कुणाला म्हणाले?

सत्तेत सहभागी होताना सर्वप्रथम समर्थन आपलेच होते. याचा मी स्वतः साक्षीदार
Published by  :
Siddhi Naringrekar

रोहित पवार यांनी ट्विट करत सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. रोहित पवार यांनी ट्विट केलं होते की, एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन #कंत्राटी_कर्मचारी काम करतील या आशयाचे एका बड्या नेत्याचे वक्तव्य ऐकूण व बदलती भूमिका बघून आश्चर्य वाटले. याच दृष्टीने विचार केला तर एका आमदारावर, खासदारावर होणाऱ्या करोडो रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील. बंडखोर आमदारांच्या सुरक्षेवर १५० कोटी खर्चासाठी, #शासन_आपल्या_दारी च्या एकेका सभेसाठी ८-१० कोटी व त्याच्या जाहिरातीवर ५२ कोटी, सरकारने गेल्या वर्षी केलेल्या कामांची यावर्षी जाहिरात करण्यासाठी शेकडो कोटी खर्च करताना काटकसर करावी, असा विचार शासन कधी करत नाही. शासकीय खर्चाची #उधळमाप शासनाला चालते. मग #नोकर_भरती साठीच शासन एवढा बारीक विचार का करते? सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांकडून #परीक्षा फीच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली करूनही पारदर्शक परीक्षा न घेऊ शकलेले सरकार प्रायव्हेट कंपन्यांना फायदा देण्यासाठी आज #कंत्राटी #भरतीसाठी जीआर काढत आहेत. केंद्र सरकार प्रमाणे कंत्राटी भरतीचे गुणगान गात आहे. सरकारला #कंत्राटी_भरती ची एवढीच हौस असेल तर राज्य सरकारच कंपनीला कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या. असे रोहित पवार यांनी म्हटले.

याच पार्श्वभूमीवर आता अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमोल मिटकरी म्हणाले की, दादा आपण लहान आणि नवखे आहोत अजुन राजकारणात! ज्यांच्याविरुद्ध आपण बोलत आहात त्यांनी आपल्यापेक्षा अनेक उन्हाळे पावसाळे जास्त पाहिलेले आहेत. सत्तेत सहभागी होताना सर्वप्रथम समर्थन आपलेच होते याचा मी स्वतः साक्षीदार आहे.आता सरकारला सरकारचे काम करू द्या. आणि स्वतःला सावरा. असे मिटकरी म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com