राज्यपालांनी ठरवलेलेच दिसतेय महाराष्ट्राच्या...; मिटकरींनी सुनावले खडे बोल

राज्यपालांनी ठरवलेलेच दिसतेय महाराष्ट्राच्या...; मिटकरींनी सुनावले खडे बोल

राज्यपाल कोश्यारींच्या 'त्या' कृतीवर अमोल मिटकरींची पोस्ट चर्चेत

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कृतीने चर्चेत असतात. यावरुन विरोधकांनी अनेकदा त्यांच्यावर टीका केली असून राज्यपाल हटाव मोर्चाही काढला होता. आता पुन्हा एकदा राज्यपाल चर्चेत आले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी शिवप्रतिमा योगी आदित्यनाथ यांना देण्यात आली. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी राज्यपालांनी खडे बोल सुनावले आहे.

राज्यपालांनी ठरवलेलेच दिसतेय महाराष्ट्राच्या...; मिटकरींनी सुनावले खडे बोल
चित्रा वाघ बालिश; राज्य महिला आयोगाने त्यांनाच पाठवली नोटीस

अमोल मिटकरींना एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. यात राज्यपाल व योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देताना दिसत आहेत. यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते. परंतु, प्रतिमा भेट देताना कोश्यारी आणि योगी आदित्यनाथ यांच्या पायात चपला घातल्याचे दिसत आहे. यावरुन मिटकरींनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

ते म्हणाले, राज्यपालांनी ठरवलेलेच दिसतेय, आम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या दैवताला किंमत देणार नाही, तुम्ही कितीही आंदोलनं करा. बघा हा फोटो बरच काही दर्शवतोय. पायात पायताण घालून जर शिवप्रतीमा देत असाल आणि बाकी सर्व मुकसंमती दर्शवित असतील तर या प्रकाराला काय म्हणावे, असा प्रश्न अमोल मिटकरींनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, राज्यपाल औरंगाबाद येथील विद्यापीठात एका कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाषण करताना छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातले आदर्श होते. आताच्या काळातले आदर्श नितीन गडकरी आहेत, असे म्हंटले होते. या विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. या वादाचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com