वाघनखं महाराष्ट्रात येत असेल तर अभिमानच, पण...; मिटकरींचा सरकारला घरचा आहेर

वाघनखं महाराष्ट्रात येत असेल तर अभिमानच, पण...; मिटकरींचा सरकारला घरचा आहेर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांना भारतात आणण्यावरुन आता महायुती आणि मविआच्या नेत्यांमध्ये आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. अशात, अमोल मिटकरी यांनी केलंलं विधान चर्चेत आले आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांना भारतात आणण्यावरुन आता महायुती आणि मविआच्या नेत्यांमध्ये आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन लक्ष वळवण्यासाठी हा विषय आणल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अशात, सरकारमधील अमोल मिटकरी यांनी केलंलं विधान चर्चेत आले आहे.

वाघनखं महाराष्ट्रात येत असेल तर अभिमानच, पण...; मिटकरींचा सरकारला घरचा आहेर
...तरच मराठा आरक्षण टिकेल अन्यथा ही फसवणूक ठरेल; संभाजी राजेंचा घणाघात

छत्रपती शिवाजी महाराज वाघनखं महाराष्ट्रात येत असेल तर चांगलं आहे. अभिमान आहे. मात्र, प्रश्न आहे वेळेचा, इतर प्रश्न बाजूला ठेवून किंवा त्याला बगल देण्यासाठी अस काय होत असेल तर ते चुकीच आहे, असा घरचा आहेर मिटकरींनी सरकारला दिला आहे.

मराठा समाजाला आरक्षणाची मागणी आम्ही सातत्याने मागत आहोत. इतर समाजाच्या आरक्षणला धक्का न लागता आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जावे. जातीनिहाय जनगणना करण गरजेचं आहे. इतर समाजावर अन्याय न होता सरकारने केली पाहिजे, असेही अमोल मिटकरींनी म्हंटले आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांचा मी चाहता आहे. महाराष्ट्रभर त्यांचा चाहता वर्ग आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. परंतु, त्यात मोदी यांच्या उज्वला योजनेचे अपयश आहे. पंकजा मुंडेंनी चुलीवर भाकरी केली हे सरकारचे अपयशच आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com