उद्धव ठाकरे यांनी मला एक खोका दिला : अमोल मिटकरी

उद्धव ठाकरे यांनी मला एक खोका दिला : अमोल मिटकरी

राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी आज शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मला आज उद्धव ठाकरे यांनी एक खोका दिला, असे म्हंटले.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी आज शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मला आज उद्धव ठाकरे यांनी एक खोका दिला, असे म्हंटले. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. परंतु, त्यात चॉकलेट दिले आहे, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली आहे,

उद्धव ठाकरे यांनी मला एक खोका दिला : अमोल मिटकरी
...तशीच हालत आम्ही बावनकुळेंची करू; अमोल मिटकरींचा इशारा

अमोल मिटकरी म्हणाले की, मला आज उद्धव ठाकरे यांनी एक खोका दिला. त्यांनी मला त्यात चॉकलेट दिले आहे. गोडवा वाढवणारा हा खोका आहे. ज्यांनी खोके घेतले आहेत त्यांनी पण उघडपणे सांगावं, असे त्यांनी म्हंटले आहे. अजूनही लोकांच्या मनात तेच मुख्यमंत्री आहेत. ही सदिच्छा भेट होती, असेही त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी मला एक खोका दिला : अमोल मिटकरी
मला कुंकुवाची अ‍ॅलर्जी; अजित पवारांचे वक्तव्य चर्चेत

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत 100 दिवसानंतर जेलबाहेर पडले. यावेळी संजय राऊत पुन्हा तोफ धडाडणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, संजय राऊत लांबची तोफ आहे. संजय राऊत हे शिवसेनेची मुलुख तोफ आहे. बोलणाऱ्यामध्ये एक जिगर पाहिजे. 102 दिवस ज्यांनी जेल यातना भोगल्या ती तोफ आता धडाडेल. शिंदे सरकारीचा पोस्ट मोर्टम दिसणार आहे, असा निशाणा त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर साधला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com