Anil Deshmukh : नवाब मलिक शांत आहेत पण जर का त्यांनी तोंड उघडले तर...

Anil Deshmukh : नवाब मलिक शांत आहेत पण जर का त्यांनी तोंड उघडले तर...

लोकशाही मराठीच्या पॉडकास्ट विथ कमलेश सुतार या कार्यक्रमामध्ये अनिल देशमुख यांची मुलाखत झाली.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकशाही मराठीच्या पॉडकास्ट विथ कमलेश सुतार या कार्यक्रमामध्ये अनिल देशमुख यांची मुलाखत झाली. या मुलाखतीमध्ये अनिल देशमुख यांनी मोठं गौप्यस्फोट केलं आहेत. या मुलाखतीत अनिल देशमुख म्हणाले की, नवाब मलिक यांना २ - २ महिन्यांची बेल मिळत आहे. त्यांनी वेगळी भूमिका घेतली असती तर त्यांच्या अडचणी वाढल्या असतात. नवाब मलिक अजूनही शांत आहेत. ​नवाब मलिक जास्त बोलत होते. त्यामुळे त्यांची जुनी प्रकरणं बाहेर काढलीत.

उद्या जर का त्यांनी काही वेगळी भूमिका घेतली तर ते अजून अडचणीत येतील. ते शांतपणे बसले आहेत. 25 वर्षापूर्वीचे प्रकरण काढायचे आणि त्यांच्यावर केसेस लावून त्यांना तुरुंगात टाकायचे. आज ते अडचणीत असल्यामुळे शांत आहेत. त्यांनी जर तोंड उघडले तर ते अजून त्यांना त्रास देतील. म्हणून ते शांत आहेत.

यासोबतच पुढे अनिल देशमुख म्हणाले की, माझ्यावर आरोप लावल्यावर काही भाजपचे नेते माझ्याकडे आले. माझ्याकडे त्यांनी चार मुद्द्यांचा एक कागद आणून दिला. काही लिहून द्यायला सांगितले, ते जर मी लिहून दिले असते तर उद्धव ठाकरे सरकार ३ वर्षांपूर्वी पडले असते. मी लिहून देण्यास नकार दिला, त्याच्या दुसऱ्या दिवशी सीबीआयची रेड झाली. मी लिहून दिलं असते तर अटकेचा प्रश्नच नव्हता. लिहून दिले असते तर मी मंत्री झालो असतो. ​जो व्यक्ती माझ्याकडे ड्राफ्ट घेऊन आला त्या व्यक्तीचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉडिंग आहे. जर मी काही मुद्दे सांगितले तर फार मोठा धमाका होईल. भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा जवळचा माणूस माझ्याकडे अनेक वेळा आला होता.

Anil Deshmukh : नवाब मलिक शांत आहेत पण जर का त्यांनी तोंड उघडले तर...
​Anil Deshmukh : ...त्या व्यक्तीचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉडिंग माझ्याकडे
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com