Anil Deshmukh : सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्यांची चौकशी होते

Anil Deshmukh : सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्यांची चौकशी होते

बारामती अ‍ॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीनं छापेमारी केली होती.
Published on

बारामती अ‍ॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीनं छापेमारी केली होती. बारामती अ‍ॅग्रोच्या सहा कार्यालयांवर छापेमारी करत ईडीकडून तपास करण्यात आला होता. यावर रोहित पवारांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर आज रोहित पवारांची ईडी चौकशी होणार आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुख म्हणाले की, अडीच तीन वर्षापासून महाराष्ट्र राज्य बाहेर चाललेला आहे. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून कशा पद्धतीने त्रास द्यायचा त्यांच्यावर कारवाई करायची. राष्ट्रवादी पक्ष रोहित पवार यांच्या पाठिशी आहे. रोहित पवार आमचे तरुण नेते आहेत. रोहित पवार यांनी जी यात्रा काढली तिला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे हा त्रास देणे सुरू आहे. भारतीय जनता पार्टीच्या एकातरी व्यक्तीच्या विरोधात कारवाई केली का? निवडणूका जवळ येतील तसे कारवाईला जास्त वेग येतील.

ईडीच्या चौकशीसाठी रोहीत पवार यांना बोलावलं आहे. विरोधकांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून ठरवून त्रास दिला जातोय. रोहीत पवार कागदपत्र घेऊन चौकशीला जाणार आहेत. राष्ट्रवादी पक्ष रोहीत पवार यांच्या पाठीशी आहे. रोहित पवार आमचे युवा नेते आहेत. जो कुणी चांगलं काम करतो. सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्यांची चौकशी होते. संघर्ष यात्रा रोहीत पवार यांनी चांगली काढली, त्यामुळे त्रास दिला जातोय. असाच त्रास मला, संजय राऊत, नवाब मलीक यांना दिला जातोय. भाजपच्या एकाही कार्यकर्त्यावर ईडीची कारवाई नाही. फक्त विरोधकांना टार्गेट केलं जातंय. निवडणुकीच्या वेळेस भाजपचे आमदार फुटणार. त्यांच्यात अस्वस्थता जास्त आहे. असे अनिल देशमुख म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com