मोठी बातमी! मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब विजयी

मोठी बातमी! मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब विजयी

विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब विजयी झाले आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब विजयी झाले आहेत. अनिल परब यांना आतापर्यंत 44,791 मते मिळाली आहेत. तर भाजपच्या किरण शेलार यांना 18,771 मते मिळाली आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडून जल्लोषाला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होणार आहे.

मुंबई पदवीधर मतदार संघात उबाठा गटाचे अनिल परब यांना पहिल्या फेरीपासून आघाडी मिळाली. भाजपा आणि उबाठा उमेदवारांमध्ये मतांमध्ये मोठा फरक पडला आहे. 4 पैकी 2 फेरीतच अनिल परब यांनी जाहीर मतांचा कोटा पूर्ण केला.

मुंबई पदवीधर मतदारसंघात दीड लाखांच्या आसपास मतदार आहेत. गेल्या 30 वर्षापासून हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गज नेत्यांनी याठिकाणी ताकद लावली होती. मात्र, त्यानंतरही अनिल परब यांनी गढ शाबूत ठेवण्यात यश मिळवलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com