Anil Parab
Anil ParabTeam Lokshahi

कुणाची हंडी कोण फोडेल हे जनताच ठरवेल; अनिल परबांची फडणवीसांवर टीका

50 थरांची दहीहंडी मी पहिल्यांदाच ऐकतोय परब यांचा शिंदेंना टोला
Published by :
Sagar Pradhan

राज्यात आज सर्वत्र दहीहंडी उत्सावाचा जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळतोय. यंदा विना निर्बंध दहीहंडी असल्यामुळे त्यामुळे मोठ्या तयारीत दहीहंडी साजरी केली जात आहे. मुंबईतही मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. विविध पक्षाच्या नेतेमंडळींनी आपल्या भागात दहीहंडीचं आयोजन केलं आहे. अनेक सेलिब्रिटी सुद्धा गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी उपस्थिती नोंदवत आहेत. मराठीसह हिंदी चित्रपट आणि मालिकेतील कलाकारांचाही त्यात समावेश आहे. गोविंदा पथकातील गोविंदाही हंडी फोडण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. हा जल्लोष सुरु असताना तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेतेही दहीहंडी उत्सवात राजकीय रंग उधळताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आपण भ्रष्टाचाराची हंडी फोडू आणि विकासाच्या हंडीतून शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम करु, असे फडणवीस यांनी विधान केल्यानंतर आता विरोधाकांकडून यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते अनिल परब यांनी आता याला प्रतिउत्तर दिले आहे.

Anil Parab
एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही; कृषिमंत्री अब्दुल सत्तार

काय केली अनिल परीब यांनी फडणवीसांवर टीका

परब म्हणाले की, कुणाची हंडी कोण फोडेल हे जनताच ठरवेल. आमची दहीहंडी ही वेगळी असते. त्यांची दहीहंडी कोणती आहे ते माहिती नाही. निवडणुकीत कळेल, असा इशारा परब यांनी फडणवीसांना दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभी नाक्यावरील दहीहंडी उत्सवात जोरदार राजकीय फटकेबाजी केली. दीड महिन्यापूर्वी आम्हीही 50 थरांची हंडी फोडली असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते. शिंदे यांच्या विधानावर बोलतांना परब म्हणाले की, ‘मी अजूनपर्यंत 8 आणि 9 थरांची दहीहंडी पाहिली आहे. 50 थरांची दहीहंडी मी पहिल्यांदाच ऐकतेय. बहुदा ते स्पेनला गेले असतील, असा टोला अनिल परब यांनी शिंदे यांना लगावला.

काय म्हणाले उपमुख्यमंत्री ?

भाजप आमदार राम कदम यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात देवेंद्र फडणवीस सहभागी झाले यावेळी त्यांनी सर्व गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या त्यावेळी ते म्हणाले की, आपलं सरकार आलं की सगळं कसं खुलं खुलं होतं. गोविंदा जोरात, गणपती जोरात आणि नवरात्रोत्सवही जोरात होणार. खेळांच्या सुविधा आमच्या गोविंदांना मिळणार आहेत. आपण विकासाची हंडी फोडलीय. त्याची फुले सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहेत. हे सर्वसामान्य माणसांचं सरकार आहे. यावेळी अशा शुभेच्छा फडणवीस यांनी उपस्थिती गोविंदाना दिल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com