अनिल परबांच्या अडचणीत वाढ; रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात बांधकाम विभागाकडून जाहिरात प्रसिद्ध

अनिल परबांच्या अडचणीत वाढ; रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात बांधकाम विभागाकडून जाहिरात प्रसिद्ध

राज्याचे माजी परिवहन मंत्री व शिवसेना नेते अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. दापोली येथील साई रिसॉर्ट पाडण्यासंदर्भातील जाहिरात स्थानिक वृत्तपत्रामध्ये देण्यात आली आहे.

रत्नागिरी : राज्याचे माजी परिवहन मंत्री व शिवसेना नेते अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. दापोली येथील साई रिसॉर्ट पाडण्यासंदर्भातील जाहिरात स्थानिक वृत्तपत्रामध्ये देण्यात आली आहे. यामुळे आता अनिल परबांच्या साई रिसॉर्टवर हातोडा पडणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

अनिल परबांच्या अडचणीत वाढ; रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात बांधकाम विभागाकडून जाहिरात प्रसिद्ध
माझ्या पद्धतीने काम करावे लागेल नाहीतर...; उदय सामंत अधिकाऱ्यांवर भडकले

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये रिसॉर्ट अनिल परब यांनी सागरी किनारा नियमांचे उल्लंघन करून आणि विनापरवानगी बांधले आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यापूर्वी अनेकदा केला आहे. यासंदर्भात सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहीले होते. अखेर आज साई रिसॉर्ट पाडण्यासंदर्भातील जाहिरात स्थानिक वृत्तपत्रामध्ये जाहिरात चिपळूण बांधकाम विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. टेंडर भरण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर देण्यात आली आहे.

हे रिसॉर्ट पाडण्यासाठी आणि ढिगाऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सुमारे ९२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तसा अंदाजपत्रकीय प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. मात्र, महसूल, पोलिस सुरक्षा आदींसाठी लागणारा खर्च अंदाजित खर्च १ कोटीवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रिसॉर्ट पाडण्यासाठी पूर्वी कन्सल्टंटची नेमणूक करण्यासाठी जाहीर निविदा काढली होती.

काय आहे प्रकरण?

शिवसेना नेते अनिल परब यांच्या मालकीचे साई रिसॉर्ट असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच ते रिसॉर्ट पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करून बांधण्यात आले असून त्याविरोधात कारवाईची मागणी सोमय्या यांनी केली होती. मागील महिन्यात पर्यावरण मंत्रालयाने रिसॉर्ट पाडण्यात का येऊ नये, अशी विचारणा करणारी ‘कारणे दाखवा’ नोटीस रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांना बजावली होती. या नोटिशीविरोधात कदम यांनी त उच्च न्यायालयात धाव घेतली. अनिल परब यांच्यासोबतच्या राजकीय वैरामुळे आपल्याला या कारवाईत अडकवले जात आहे, असा दावा त्यांनी याचिकेत केला होता. यानंतर कारवाई करताना रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांना पूर्वसूचना देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी केंद्रीय मंत्रालयाला दिले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com