Anna Hazare | Eknath Shinde | Devendra Fadnavis
Anna Hazare | Eknath Shinde | Devendra FadnavisTeam Lokshahi

'ध्येयवादी लोकच असे निर्णय घेऊ शकतात'; अण्णांकडून शिंदे-फडणवीसांचे कौतुक

लोकायुक्त कायदा अधिवेशनात मांडणार असल्याची माहिती दिली होती. त्यावरच आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं फोन करून अभिनंदन केलं आहे.

आजपासून नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. मात्र, काल अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत लोकायुक्त कायदा अधिवेशनात मांडणार असल्याची माहिती दिली होती. त्यावरच आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं फोन करून अभिनंदन केलं आहे.

Anna Hazare | Eknath Shinde | Devendra Fadnavis
रोहित पवार हा बिनडोक माणूस, का म्हणाले पडळकर असं?

नेमकं काय म्हणाले अण्णा हजारे?

राळेगणसिद्धी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकार लोकायुक्त कायदा आणण्याच्या तयारीत आहे. याच पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी फडणवीसांचं कौतुक करत 'ध्येयवादी लोकच असे निर्णय घेऊ शकतात', असं म्हटलं आहे. सत्तेची हवा डोक्यात गेल्यावर अनेक लोक बदलतात. मात्र काही ध्येयवादी लोकं नागरिकांच्या हिताचे निर्णय घेत असतात. हे विधेयक सरकार आणत असल्याबद्दल आपण मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना फोन करून अभिनंदन केलं'' असं अण्णा हजारे यांनी सांगितलं.

''लोकआयुक्त हा स्वायत्तता असणारा कायदा आहे. त्याचा दर्जा उच्च न्यायालयाच्याबरोबर आहे. कायदे खूप आहेत. पण पालन केलं नाही तर कोणी विचारत नाहीत. राज्य सरकारचा हा निर्णय राज्यासाठी समाधानकारक आहे. लोकायुक्त हा स्वायत्ता असलेला कायदा आहे. लोकायुक्ताला उच्च न्यायालयाचा दर्जा आहे. हा कायदा इतरांपेक्षा वेगळा आहे'', असंही ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com