Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Team Lokshahi

ठाकरे गटाला पुन्हा एक मोठा धक्का; आता मशाल चिन्हही जाणार

26 फेब्रुवारीपर्यंतच या चिन्ह आणि पक्षाचं नाव वापरण्याची मुदत आहे. त्यामुळे ठाकरे गटाला 26 फेब्रुवारीनंतर हे चिन्ह वापरता येणार नाही.

राज्यात राजकारणातून काल सर्वात मोठी बातमीसमोर आली. त्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट शिवसेना नक्की कोणाची यावरून दावे- प्रतिदावे सुरु होते. त्यातच सुप्रिम कोर्टात सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु असताना अचानक काल केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला आणि शिवसेना नावासह धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले. मात्र, आता ठाकरे गटाला पुन्हा एक धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडे असणारे मशाल चिन्ह सुद्धा आता जाणार आहे.

Uddhav Thackeray
'उद्धव ठाकरेंनी शिंदेंसोबत जुळवून घ्यावे अन् शिवसेना वाचवावी'

ठाकरे गटाला टेन्शन देणारी आणखी एक बातमी आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह काढून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता ठाकरे गटाला मशाल चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव फक्त चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीपर्यंतच वापरता येणार आहे. 26 फेब्रुवारीपर्यंतच या चिन्ह आणि पक्षाचं नाव वापरण्याची मुदत आहे. त्यामुळे ठाकरे गटाला 26 फेब्रुवारीनंतर हे चिन्ह वापरता येणार नाही. तशी ऑर्डरच निवडणूक आयोगाने काढली आहे. त्यानंतर हे नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी किंवा नवीन नाव आणि चिन्ह घेण्यासाठी ठाकरे गटाला पुन्हा निवडणूक आयोगाकडे जावं लागणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

यासाठी दिले होते नवे नाव आणि चिन्ह?

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर पहिल्यांदाच अंधेरी विधानसभा पोटनिवडणुक जाहीर झाली. त्यानंतर शिंदे गटाने शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हावर हक्क सांगितला होता. त्यानंतर निवडणूक निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठवले होते. तात्पुरत्या स्वरूपात ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिले होते. शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आले होते. तसेच शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com