शिंदे गटाचा आणखी एक मंत्री वादात! शिवीगाळ केल्याची पोलिसात तक्रार दाखल

शिंदे गटाचा आणखी एक मंत्री वादात! शिवीगाळ केल्याची पोलिसात तक्रार दाखल

शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी दिल्याने वादात सापडले होते. यामुळे शिंदे सरकारवर विरोधकांनी हल्लाबोल केला होता.

सचिन बडे | औरंगाबाद : शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी दिल्याने वादात सापडले होते. यामुळे शिंदे सरकारवर विरोधकांनी हल्लाबोल केला होता. अशातच आता शिंदे गटाचे आणखी एक मंत्र्यांविरोधात शिवीगाळ केल्याने थेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शिंदे गटाचा आणखी एक मंत्री वादात! शिवीगाळ केल्याची पोलिसात तक्रार दाखल
आदर पुनावाला यांना एक कोटीच्या गंडाप्रकरणी बिहारमधून चौघे ताब्यात

शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याने पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. भुमरेंविरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याच्या कारणावरून संदिपान भुमरे यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावाही करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस युवक उपाध्यक्ष युवराज चौरे असे तक्रारदाराचे नाव आहे. तसेच, फोन कॉलची रेकॉर्डिंग होऊ नये म्हणून व्हॉट्स अ‍ॅपवर भुमरेंचा कॉल आल्याची माहिती त्याने दिली. यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळेंनी 50 खोके मिळाले का, असा प्रश्न अब्दुल सत्तारांना केला होता. यावर सत्तारांनी तुम्हालाही द्यायचे का, असा प्रतिप्रश्न केला होता. सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर देत तुमच्याकडे असल्यानेच तुम्ही ऑफर करत असल्याची टीका केली होती. तर, सत्तारांनी इतकी भि***ट झाली असेल तिलाही देऊ, असे वादग्रस्त वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केले होते. यानंतर राज्यभरातून त्यांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादीने निदर्शने केली. अखेर सत्तारांनी खेद व्यक्त केला होता. यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना लास्ट वार्निंग दिली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com