राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक; म्हणाले, ‘सीएम छाए जा रहे हैं, साथ ही....
भारत जैन महामंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक केले, राज्यपालांनी यावेळी विशेष शैलीत मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. त्यामुळे सभागृहात एकच टाळ्यांचा गडगडाट झालेला पाहायला मिळाला.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले की, ‘मुख्यमंत्री होऊन एकनाथ शिंदे यांना अवघे काही दिवसच झाले आहेत, पण काही दिवसांतच ते प्रसिद्ध झालेत. मुख्यमंत्र्यांनी अवघ्या दिवसांतच आपली छाप पाडली आहे.' पुढे ते म्हणाले, ‘सीएम छाए जा रहे हैं, साथ ही बादल भी छायें जा रहै हे’ असे बोलताना विधान केल्यानतंर सभागृहात टाळ्यांचा एकच गडगडाट झाला.
राज्यात एकीकडे मुख्यमंत्री शिंदे कमी वेळेत प्रचंड चर्चेत आलेले असताना, दुसरीकडे राज्यभर सुरु असलेल्या मुसळधार पाऊस या दोन्ही गोष्टीचा संदर्भ घेत राज्यपालांनी शब्द जुळवून खास मुख्यमंत्र्यांचे कौतूक करून मन जिंकले. सोबतच त्यांनी क्षमा करणं आणि क्षमा मागणं यायला हवं, मुख्यमंत्री शिंदे यांच्या या वक्तव्यावर स्तुतीसुमने उधळली.