'नारायण राणे, एकनाथ शिंदे यांच्या मागेही ईडी लावा'

'नारायण राणे, एकनाथ शिंदे यांच्या मागेही ईडी लावा'

शिवसेना नेते अरविंद सावंत यांचे आव्हान
Published on

मुंबई : नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांच्यावर देखील ईडी लावा. त्यांच्या केसेसचं काय झालं बघा. ते देखील स्वच्छ नाही आहेत. एकनाथ शिंदे यांचं नाव घेऊन मी बोलतो, असे आव्हान शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी दिले आहे. ते माध्यमांशी संवाद साधत होते.

संजय शिरसाट यांनी उध्दव ठाकरेंचा व्हिडीओ ट्विट केला होता. यावर अरविंद सावंत म्हणाले, हे ब्लॅकमेलिंग सुरु आहे. ते तिथे गेले त्यांना मंत्रिपद मिळालं नाही त्यामुळे त्यांनी नाराजी दाखवली. त्यांनी नाराजी दाखवली तेव्हा बडबोले प्रवक्ते लगेच सारवासारव करायला गेले. हे जनतेच्या देखील लक्षात आलेलं आहे, असे म्हणत त्यांनी केसरकरांवर निशाणा साधला.

आशिष शेलार यांनी निवडणूक घ्यावी. ते निवडणूक का लांबवत आहेत. जर हिम्मत असेल तर निवडणूक लढवा. मग, महापौराच्या गोष्टी करा, असा टोलाही अरविंद सावंत यांनी लगावला आहे.

हे सगळे ईडीला घाबरून गेलेले लोकं आहेत. एक ईडीच्या रडारवर असलेल्या खासदाराचा मोदींना राखी बांधतांना फोटो आला. यावरून स्पष्ट झालं आहे की ही ईडीची राखी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांच्यावर देखील ईडी लावा. त्यांच्या केसेसचं काय झालं बघा. ते देखील स्वच्छ नाही आहेत. एकनाथ शिंदे यांचं नाव घेऊन मी बोलतो. भाजपकडून धुलाई मशीन चालू केली आहे. किती जण धुलाई मशीनमध्ये स्वच्छ होण्यासाठी गेले आहेत, अशीही टीका अरविंद सावंत यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com