अश्विनी जगतापांच्या विजयावर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया; एक मांजर आडवं गेलं नसत तर...

अश्विनी जगतापांच्या विजयावर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया; एक मांजर आडवं गेलं नसत तर...

चिंचवड मतदारसंघातून भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचा मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.

पुणे : कसब्यानंतर चिंचवड मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर या मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आहे. भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचा मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. अश्विनी जगताप यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव केला. यावर ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया आली आहे. एक मांजर आडवं गेलं नसत तर ती जागा महाविकास आघाडीची असती, असे सूचक विधान त्यांनी केले आहे.

अश्विनी जगतापांच्या विजयावर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया; एक मांजर आडवं गेलं नसत तर...
कसब्यात भाजपचा बालेकिल्ला ढसाळला! चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू

चिंचवड पोटनिवडणुकीच्या रिंगणात भाजपकडून अश्विनी जगताप तर राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना संधी देण्यात आली होती. परंतु, राष्ट्रवादी नेते राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष फॉर्म भरला. यामुळे चिंचवडची निवडणूक ही तिरंगी पाहायला मिळाली. यात अश्विनी जगताप यांचा 1 लाख 35 हजार 434 मतांनी विजय झाला आहे. तर, नाना काटे यांना ९९ हजार ३४३ मते मिळाली आहेत. तर, बंडखोर आमदार राहुल कलाटे यांना 44 हजार 082 मते मिळाली आहेत.

यावर प्रतिक्रिया देताना अरविंद सावंत म्हणाले की, मुख्यमंत्री व गृहमंत्री दोन दिवस चिंचवडमध्ये ठाण मांडून होते. तरी जनतेने त्यांना कसब्यात दाखवून दिले. तिचं गोष्ट पिंपरी-चिंचवडमध्ये निसटता जरी विजय झाला असला तरी एक मांजर जर आडवं गेलं नसत. त्याची मदत धरली तर भारतीय जनता पार्टीविरोधात किती मतं झाली अस जर काढलं. तर तीही जागा महाविकास आघाडी जिंकली असती, असा दावा त्यांनी केला आहे.

दरम्यान, अजित पवारांनीही प्रतिक्रिया देताना पिंपरी-चिंचवडमध्ये सुद्धा आमचा विजय झाला असता. राहुल कलाटे यांना मी सतत सांगितले पण त्यांनी ते ऐकले नाही. कारण तेथून ते उभे रहावे म्हणून काही जण सतत प्रयत्नात होते. नाहीतर दोन्ही जागी आमचा विजय झाला असता. पण, सत्ताधारी पक्षाने सर्व यंत्रणांचा वापर केला, असा आरोप त्यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com