Chandrakant Patil
Chandrakant Patil Team Lokshahi

कसब्यात भाजपचा बालेकिल्ला ढसाळला! चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू

कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल आज लागला. कसब्यात भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

मुंबई : कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल आज लागला. कसब्यात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करत काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत. यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू, असे त्यांनी म्हंटले आहे.

Chandrakant Patil
आठवलेंनी रचला इतिहास; नागालॅंडमध्ये दोन जागांवर विजयी

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील‌ जनतेचा कौल आम्ही नम्रपणे स्विकारतो. लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च आहे. कसब्याच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. या निवडणुकीत सर्वस्व झोकून काम करणाऱ्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार. नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू, असा निर्धार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

तर, चिंचवडमध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप विजयाच्या समीप आहेत. याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, आजचा अश्विनीवहिनींचा बलाढ्य विजय हा स्व. लक्ष्मणभाऊंच्या मतदारसंघातील कार्याची पोचपावती आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन अश्विनीवहिनीही जनहितासाठी दिवसरात्र झटतील, असा आम्हाला विश्वास आहे. आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि मतदार बंधू-भगिनींचे आभार, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, कसब्यातून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव करत विजय मिळवला. तर, चिंचवडमध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांनी 1 लाख 35 हजार 434 मतांनी विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या नाना काटे यांचा पराभव जगतापांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com