Arvind Sawant | Nitin Deshmukh
Arvind Sawant | Nitin Deshmukh Team Lokshahi

देशमुखांना आलेल्या एसीबीच्या नोटीसवर सावंतांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, सज्जन माणसाला...

आमदार नितीन देशमुख यांना नोटीस देऊन ठाकरे गटाला ब्लॅकमेलिंगचा हा सगळं प्रकार आहे. निवडणूका समोर येतील तस ठाकरे गटाच खच्चीकरण करण्याचा प्रयत्न.
Published by :
Sagar Pradhan

अमरावती: राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये देखील वाद सुरुच आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या अडचणी दिवसांदिवस वाढतच चालले आहे. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना एसीबीने नोटीस पाठवली. त्यावरच आता शिवसेना ठाकरे गट नेते अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गट भाजप कडून ब्लॅकमीलिंग सुरू असल्याचा देखील आरोप अरविंद सावंत यांनी केला आहे.

Arvind Sawant | Nitin Deshmukh
ठाकरे गट पुन्हा अडचणीत, गुवाहाटीवरून परतलेले आमदार नितीन देशमुख यांना एसीबीची नोटीस

काय म्हणाले अरविंद सावंत?

आमदार नितीन देशमुख यांना आलेल्या एसीबीच्या नोटीसवर बोलताना ते म्हणाले की, शिंदे गट भाजप कडून ब्लॅकमीलिंग सुरू असल्याचा ते यावेळी म्हणाले. भ्रष्टाचारी वृत्तीची माणसे उलट सज्जन माणसाला भ्रष्टाचारी करण्याचा प्रयत्न करत आहे. आमदार नितीन देशमुख यांना नोटीस देऊन ठाकरे गटाला ब्लॅकमेलिंगचा हा सगळं प्रकार आहे. निवडणूका समोर येतील तस ठाकरे गटाच खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होणार असून नितीन देशमुख यांच्याकडे चौकशीत काही कागदपत्रे सापडणार नाहीत. या सर्व आरोपांमुळे आता भाजपा व शिंदे गटाची घृणा यालाला लागली. अशा शब्दात त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर टीका केली आहे.

गुवाहाटीला न जाता सूरतहून परतलेले आमदार नितीन देशमुख यांना आज एसीबीने नोटीस पाठवली. देशमुख यांना मालमत्तेबाबत जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे आदेश या नोटीसमध्ये देण्यात आले आहेत. त्यासाठी 17 जानेवारीला एसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देशमुखांना देण्यात आले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com