हे टु इन वनचं सरकार आहे; ओवैसींचे शिंदे-फडणवीसांवर टीकास्त्र

जिल्ह्याच्या मलकापूर येथे एमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी यांची जाहिर सभा संपन्न झाली
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

संदीप शुक्ला | बुलढाणा : जिल्ह्याच्या मलकापूर येथे एमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी यांची जाहिर सभा संपन्न झाली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेना सेक्युलर आहे का? पण शरद पवार आणि राहुल गांधी यांनी म्हंटले की शिवसेना सेक्युलर आहे, अशा शेलक्या भाषेत असदुद्दीन ओवैसी यांनी महाविकास आघाडीची टर उडवली.

लव जिहाद वर बोलताना ते म्हणाले की, हे टु इन वनचं सरकार आहे. पहिले थ्री इन वनचं सरकार होतं. माझं देवेंद्र फडणवीस यांना चॅलेंज आहे की तुम्ही लव जिहाद काय आहे हे आधी ठरवा. पण, ते ठरवू शकत नाही तर महविकास आघाडीचे तर फक्त सरकारच गेलं पण आमचं तर अस्तित्वाचं नुकसान भाजपा सरकारमुळे झालं, असा आरोप ओवेसी यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com