अशोक चव्हाण कॉंग्रेसवर नाराज? महामोर्चाला  दांडी; चर्चांना उधाण

अशोक चव्हाण कॉंग्रेसवर नाराज? महामोर्चाला दांडी; चर्चांना उधाण

कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण हे सहभागी होणार नाही. यामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे.

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि अन्य भाजप नेत्यांचे वादग्रस्त वक्तव्यांविरोधात महाविकास आघाडीकडून राज्य सरकारविरोधात आज महामोर्चा काढण्यात येणार आहे. यात महाविकास आघाडी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. यादरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह बडे नेते महामोर्चात सहभागी होणार आहे. परंतु, कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण हे सहभागी होणार नाही. यामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे.

अशोक चव्हाण कॉंग्रेसवर नाराज? महामोर्चाला  दांडी; चर्चांना उधाण
शिंदे गट व भाजपच्या डोक्यात गांडूळाचा मेंदू; राऊतांचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

महाविकास आघाडीच्या महामोर्चाला आज अशोक चव्हाण उपस्थित राहणार नाहीत. यासंबंधीचे माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली असून त्यामागचे कारणही सांगितले आहे. महाविकास आघाडीच्या १७ डिसेंबर रोजी नियोजित मोर्चाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र एका निकटवर्तीय कुटुंबातील नांदेड येेथे पूर्वनियोजित विवाह सोहळ्यामुळे मला मोर्चात सहभागी होणे शक्य नाही. माजी आमदार अमिता चव्हाण तिथे उपस्थित राहतील. कृपया वस्तुस्थितीची नोंद घ्यावी, असे ट्विट अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

शिवसेनेनंतर काँग्रेसमध्ये बंड होणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. त्याचे कारण असे की, मागील काही दिवसात काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांनी भाजपचा वरिष्ठ नेते मंडळींची भेट घेतली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यानंतर अशोक चव्हाण नाराज असून लवकरच कॉंग्रेसची साथ सोडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. परंतु, अशोक चव्हाण यांनी या चर्चा फेटाळून लावल्या होत्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com