जे बिहारमध्ये शक्य आहे ते महाराष्ट्रात का नाही? अशोक चव्हाण यांचे ट्विट
आरक्षणाचा मुद्दा बिहारमध्ये देखिल सुरु झाला आहे. याच पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावली. सध्या आरक्षणाची मर्यादा 50% आहे. ही आरक्षण मर्यादा वाढवून 65% करण्यासंदर्भात हा प्रस्ताव आहे. या बैठकीत आरक्षणाची व्याप्ती वाढवण्यावर चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मागास लोकांना 10% आरक्षण असं एकूण 75% आरक्षणाची मर्यादा वाढवली जावी. असा प्रस्तावात उल्लेख करण्यात आले आहे. त्यामुळे आता 50 वरून 65 पर्यंत ही मर्यादा वाढवली जाऊ शकते.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी ट्विट केलं आहे. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण म्हणाले की, बिहार विधानसभेने आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करण्याबाबतचे विधेयक मंजूर केले आहे. विशेष म्हणजे या विधेयकाला भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनीही पाठिंबा दिला. जे बिहारमध्ये शक्य आहे ते महाराष्ट्रात का नाही? राज्य विधीमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारने महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा शिथिल करण्याबाबत पावले उचलावीत; जेणेकरून मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर होऊ शकेल.
देशात जातीय जनगणना करावी आणि आरक्षणाची मर्यादा शिथिल करावी, अशी भूमिका काँग्रेस पक्षाने अगोदरच घेतली असून हैद्राबाद व नवी दिल्ली येथे झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत तसे ठरावही मंजूर करण्यात आले आहेत. असे काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण म्हणाले.