अशोक चव्हाण यांची पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

अशोक चव्हाण यांची पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

आता अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अशोक चव्हाण यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण म्हणाले की, या पुढची राजकीय दिशा 2 दिवसांत घेईन. 2 दिवसांत राजकीय दिशा ठरवेन. भाजपाची कार्यप्रणाली मला माहित नाही. भाजपामध्ये जाण्याचा निर्णय मी अद्याप घेतलेला नाही. प्रत्येक गोष्टीला कारण असलं पाहिजे अस नाही. माझी कोणाबद्दल तक्रार नाही. मी काँग्रेसमध्ये कुणावरही नाराज नाही. माझ्या मनात कोणाबद्दल व्यक्तीगत भावना नाही. जन्मापासून काँग्रेसचं काम केलं. काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केलं. काँग्रेसच्या कोणत्याच आमदारासोबत चर्चा केलेली नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com