सायबर गुन्हांविरोधातील कायदा अधिक कठोर करा; अस्लम शेख यांची विधानसभेत मागणी

सायबर गुन्हांविरोधातील कायदा अधिक कठोर करा; अस्लम शेख यांची विधानसभेत मागणी

सायबर गुन्ह्यांविरोधात अस्लम शेख यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीसांचे उत्तर
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

रिध्देश हातीम | मुंबई : देशात व राज्यात सायबर गुन्ह्यांचे वाढत चाललेले प्रमाण व त्या माध्यमातून होणारी नागरिकांची फसवणूक पाहता सायबर गुन्ह्यांविरोधात असलेल्या कायद्यातील तरतुदी अधिक कठोर करण्याची मागणी आमदार अस्लम शेख यांनी आज विधानसभेत केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत लवकरच याबाबतीत एक सक्षम कायदा अस्तित्वात येईल, असे सांगितले आहे.

सायबर गुन्हांविरोधातील कायदा अधिक कठोर करा; अस्लम शेख यांची विधानसभेत मागणी
मोठी अपडेट! धनुष्यबाण काढून नितीन देसाईंची आत्महत्या; 'त्या'चा अर्थ काय?

अस्लम शेख म्हणाले, ओळख लपवून नंबर देणे, महिलांना फसवणे, हनीट्रॅप सारखे प्रकार वाढत चालले आहेत. इतर गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत चालली आहे. मागे अशाच स्वरुपाच्या सायबर गुन्ह्याचा बळी ठरलेला १६ वर्षांचा बालकलाकार आत्महत्या करायला निघाला होता.

आज सायबर गुन्ह्यांविरोधात असणारे कायदे कमकुवत आहेत. आरोपींना जामीन पटकन मिळतो. कायद्यातील तरतुदी कठोर करुन जामीन कसा लवकर मिळणार नाही हे पाहायला हवे. कारण गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, तो कोणत्या धर्माचा नसतो, असेही त्यांनी म्हंटले आहे.

यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, सायबर गुन्ह्यांसंदर्भात इंडियन आयटी अॅक्ट अंतर्गत कारवाई करण्यात येते. हा कायदा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. सर्वोच्च न्यायालयाच्या काही निकालांमुळे हा कायदा कमकुवत झाला आहे. मात्र केंद्र सरकारने आता हा कायदा सुधारायला घेतला आहे. महाराष्ट्र सरकारनेही या कायद्यासंदर्भात आपली मतं व सूचना पाठवलेल्या आहेत. लवकरच याबाबतीत एक सक्षम कायदा अस्तित्वात येईल, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com