राजकारण
जयंत पाटलांनी दिलेल्या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे मोठं विधान
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
Rahul Narvekar : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल नार्वेकर म्हणाले की, 9 आमदारांच्या अपात्रतेची याचिका आली आहे. याचिका पाहून योग्य निर्णय घेण्यात येईल. घटनेतील तरतुदी विधानसभेचे नियम पाहूनच निर्णय घेणार. जयंत पाटील यांची याचिका प्राप्त झाली आहे.