Imtiyaz Jaleel | Chhatrapti Sambhajinagar
Imtiyaz Jaleel | Chhatrapti SambhajinagarTeam Lokshahi

छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगासोबत झळकले औरंगजेबचे पोस्टर, जलील यांच्या उपोषणातील प्रकार

औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराविरोधात आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरुवात.

सचिन बडे| छत्रपती संभाजीनगर: काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला मंजुरी दिली. एकीकडे नामांतराला मंजुरी मिळाल्यानंतर जल्लोष साजरी होत असताना दुसरीकडे तर दुसरीकडे आता या निर्णयाचा विरोध होताना देखील दिसत आहे. दरम्यान, या नामांतराविरुद्ध आज छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरूवात केली. मात्र, त्यावेळी औरंगजेबाचे फोटो झळकल्याने मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराविरोधात इम्तियाज जलील आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरुवात केली. यावेळी विविध पक्ष संघटनांसह शेकडो नागरिकांनी देखील या उपोषणात सहभाग नोंदवला. परंतु, यावेळी छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध करत एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी उपोषणात औरंगजेबाचे फोटो झळकावले. मात्र, या कृतीमुळे आता मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com