Baba Siddique : काँग्रेसला मोठा धक्का; बाबा सिद्दिकी यांनी दिला काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा

Baba Siddique : काँग्रेसला मोठा धक्का; बाबा सिद्दिकी यांनी दिला काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा

बाबा सिद्दिकी यांनी दिला काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मिलिंद देवरा यांच्यानंतर काँग्रेसला मुंबईत दुसरा मोठा धक्का समजला जातो. बाबा सिद्दीकी यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे.

बाबा सिद्दिकी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मी तरुणपणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झालो आणि 48 वर्षांचा हा एक महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. @INCIndia तातडीने. मला व्यक्त करायला खूप काही आवडले असते पण ते म्हणतात त्याप्रमाणे काही गोष्टी न सांगितल्या जातात. या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो. असे बाबा सिद्दिकी म्हणाले.

कोण आहे बाबा सिद्दीकी?

1999, 2004 आणि 2009 मध्ये ते सलग तीन वेळा वांद्रे पश्चिम मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सिद्दीकी यांची नियुक्तीही केली होती. तसेच 1992 आणि 1997 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com