मंत्रिमंडळ विस्तार करू नका; बच्चू कडूंची अजब मागणी
अमरावती : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित आहेत. अशातच, सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी अजब मागणी केली आहे. मंत्रिमंडळ विस्तार करू नका जसं आहे तसंच चालू द्या, असे बच्चू कडू यांनी म्हंटले आहे.
मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने मंत्रिपदाचा दावा आमदार बच्चू कडू यांनी सोडला आहे. तर विस्तार केव्हा होईल हा प्रश्न बच्चू कडू यांना विचारला असता त्यांनी उत्तर दिलं की, मंत्रिमंडळ विस्तार झाला तर मी इथं राहणार नाही. मी अमेरिकेत राहील. तर आता मंत्रिमंडळ विस्तार करू नका जसं आहे तसंच राहू द्या, असा टोला त्यांनी लगावला आहे. विनाकारण चार लोकांना दुःखी कराल याला घेतलं नाही, त्याला घेतलं नाही. यामुळे सरकार चांगल्या पद्धतीने चालत आहे व जे मंत्री आता आहे ते सक्षम आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.