बच्चू कडूंना राग झाला अनावर अन् थेट कार्यकर्त्याच्या लगावली कानशिलात; व्हिडीओ व्हायरल

बच्चू कडूंना राग झाला अनावर अन् थेट कार्यकर्त्याच्या लगावली कानशिलात; व्हिडीओ व्हायरल

बच्चू कडू नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत

सूरज दहाट | अमरावती : बंडखोर आमदार बच्चू कडू नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. यावेळी मात्र वेगळ्या कारणामुळे ते चर्चेत आले आहेत. त्यांनी स्वतःच्याच कार्यकर्त्याला कानशिलात लगावली आहे. अमरावतीमध्ये ही घटना घडली असून हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर आता सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुकास्थित गणोजा गावात बच्चू कडू रस्ता उद्घाटनासाठी गेले होते. यावेळी रस्त्याच्या कामकाजा संदर्भात कडू आणि कार्यकर्त्यामध्ये शाब्दिक वादावादी झाली. यावेळी राग अनावर झाल्याने बच्चू कडूंनी स्वतःच्याच कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली आहे. यादरम्यानचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com