अजितदादांना मुख्यमंत्री केलं तर त्याचे परिणाम...;- बच्चू कडू
उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री होणार अशा चर्चांना उधाण आले आहे. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एका माध्यमाशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, प्रत्येक नेता आपला पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करत असतो. काका-पुतण्याच्या भेटीगाठीवरून संभ्रमित होण्याचं काही कारण नाही. जेव्हा भाजपसोबत कोणीच नव्हतं तेव्हा शिंदे त्यांच्यासोबत आले. त्यांनी मोठी रिस्क घेतली. त्यांना डावलून अजितदादांना मुख्यमंत्री केलं तर त्याचे परिणाम वाईट होतील. असे बच्चू कडू म्हणाले.
तसेच शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडून भाजपसोबत आले आहेत.अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत. समजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डावलून अजितदादांना मुख्यमंत्री केलं तर भाजपला खूप परिणाम भोगावे लागतील. असे बच्चू कडू यांनी सांगितले.