राहुल गांधींपेक्षाही मूर्खपणा अमित शहा यांनी केला; Bacchu kadu असं का म्हणाले?

राहुल गांधींपेक्षाही मूर्खपणा अमित शहा यांनी केला; Bacchu kadu असं का म्हणाले?

संसदेत गृहमंत्री अमित शाह यांनी यवतमाळच्या कलावती बांदूरकर या शेतकरी विधवा महिलेला काँग्रेसने केलेल्या मदतीच्या संदर्भात एक वक्तव्य केलं.
Published by  :
Siddhi Naringrekar

संसदेत गृहमंत्री अमित शाह यांनी यवतमाळच्या कलावती बांदूरकर या शेतकरी विधवा महिलेला काँग्रेसने केलेल्या मदतीच्या संदर्भात एक वक्तव्य केलं. अमित शाह म्हणाले की, . कलावती यांच्या शेतकरी पतीने आत्महत्या केली होती. त्यानंतर 2008 मध्ये राहुल गांधी यांनी कलावती यांची भेट घेतली होती. राहुल गांधी हे कलावती यांच्या घरी जेवायला गेले होते आणि त्यानंतर त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली गेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कलावतीला सर्व काही पुरवले असे ते म्हणाले.

यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू म्हणाले की, अमित शाहांमुळे भाजपा अडचणीत येईल. कलावती यांच्या बाबतीत पाहिला मूर्खपणा राहुल गांधींनी केला आहे. आता त्यापेक्षाही मूर्खपणा अमित शहा यांनी केला. अमित शाह यांच्या वक्तव्यामुळे भाजप अडचणीत येत आहे. एका कलावतीला घर बांधून देऊन वीज देऊन राहुल गांधी यांनी देखावा केला, तेव्हा तुमचं सरकार राज्यात केंद्रात, होतं तर धोरण आखायला पाहिजे होत. एका कलावतीला घर देणं हे चुकीच आहे. अमित शाह लोकसभेत जे काही बोलले, ते सर्व खोटे बोलले. अमित शाह यांनी एवढं मोठ बोलताना विचारपूर्वक बोलायला पाहिजे होतं. असं बच्चू कडू म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com